Logo

राघवेंद्र बाप्पू मानकर

सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष, पुणे शहर

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्याविषयी

राघवेंद्र बाप्पू मानकर हे पुणे शहरातील जनतेसाठी समर्पित असलेले युवा, तडफदार आणि लोकाभिमुख नेते आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्ष, पुणे शहराचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजयुमो (भाजप युवा मोर्चा) मध्ये संपर्क प्रमुख तसेच शहराध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. कार्यकर्त्यांचं मोठं संघटन, तरुणांना राजकारणात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करणे आणि सामाजिक बदलासाठी कार्य करणे ही त्यांची ओळख आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी लोकहितासाठी केलेली कामे आजही अनेकांच्या लक्षात राहण्यासारखी आहेत.

कामे

Work 1

२४ तास जनसेवा कार्यालय

२०१७ पासून सुरू असलेले २४ तास खुले जनसेवा कार्यालय हे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र आहे. वैद्यकीय, प्रशासकीय किंवा आपत्कालीन अडचणी असोत—राघवेंद्र बाप्पू मानकर आणि त्यांची टीम कोणत्याही वेळी तत्काळ मदत उपलब्ध करून देत जनतेचा आधार बनली आहे.

Work 2

मिशन स्वच्छ प्रभाग–२५

‘मिशन स्वच्छ प्रभाग–२५’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता यंत्रणा उभारणी, नागरिक जनजागृती, ५,००० डस्टबिनचे वाटप आणि स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शनिवार पेठ व परिसरात स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास चालना मिळत आहे.

कोविड काळातील आधार

कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी निःस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर, रेशन किट, जेवण आणि मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आणि कठीण काळात माणुसकीचा आदर्श घडवला.

परंपरा आणि संस्कृती

गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत बाप्पूंनी सांस्कृतिक परंपरा जपल्या आहेत. सदाशिव पेठेतील भव्य श्रीरामलल्लांचे भित्तीचित्र, सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिनी मुक्तद्वार महाप्रसाद आणि सैनिक सन्मान उपक्रम ही त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेची ठळक उदाहरणे आहेत.

कारकीर्द

1

२०१२- बँक कर्मचारी यांच्यासाठी कामाला सुरुवाात

बँक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पाऊल

2

२०१७- भारतीय जनता पक्ष

२०१७ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनसेवेला सुरुवात

3

२०१८- २४ तास जनसेवा कार्यालयय

पुण्यातील पहिले २४ तास खुले जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण

4

२०२० - भाजयुमो शहराध्यक्ष

भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पुणे शहराध्यक्ष पदी निवड

5

२०२३ - भाजपा, पुणे शहर सरचिटणीस

भारतीय जनता पक्ष पुणे शहर सरचिणीस पदी निवड

6

२०२५ - पुणे शहर सरचिटणीसपदी पुनर्निवड

भारतीय जनता पक्ष पुणे शहर सरचिटणीस पदी पुन्हा संधी

कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व । राघवेंद्र बाप्पु मानकर कार्यअहवाल

राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या कार्याचा आढावा सांगणारा कार्यअहवाल

कार्यअहवाल डाउनलोड करा

संपर्क

संपर्क माहिती

राघवेंद्र बाप्पू मानकर
२४ तास जनसेवा कार्यालय,
सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे

मोबा:  83810 79079

ई-मेल:  bapumankarbjp@gmail.com

संदेश पाठवा